सामाजिक बांधिलकीची पहिली पायरी...

'क्रांतीज्योती सेवाभावी संस्थे'च्या सामाजिक प्रवासाची पाळेमुळे खूप जुनी आहेत. सन १९९९ मध्ये अवघ्या १२ वर्षांचे असताना संस्थापक अध्यक्ष श्री. निलेश विधाते यांनी 'शिवरत्न मित्र मंडळा'ची स्थापना केली होती. त्यांनी सलग ११ वर्षे (१९९९ ते २०१०) या मंडळाचे अध्यक्षपद यशस्वीपणे भूषवले. प्रस्तुत छायाचित्र सन २००१ मधील गणेशोत्सवाचे असून, अवघ्या १४ व्या वर्षी ते मंडळाचे नेतृत्व करत होते, तर त्या वेळी श्री. गणेश निंबाळकर हे उपाध्यक्ष म्हणून सोबत होते. अध्यक्षांना बालपणापासूनच सार्वजनिक उपक्रमात सहभागी होण्याची आवड होती, हीच आवड पुढे चालून एका मोठ्या सेवाभावी कार्यात रूपांतरित झाली.


The First Step Towards Social Responsibility...

The roots of 'Krantijyoti Sevabhavi Sanstha' run deep into a legacy of community service. In 1999, at the tender age of just 12, the Founder President of the NGO, Mr. Nilesh Vidhate, initiated his social journey by establishing the 'Shivratna Mitra Mandal'. Demonstrating exceptional long-term leadership, he served as the President of this Mandal for 11 consecutive years (from 1999 to 2010). This featured photograph captures the Ganeshotsav of 2001, where at just 14 years old, he was dynamically leading the group, with Mr. Ganesh Nimbalkar supporting him as the Vice President at that time. Driven by a childhood passion for community engagement, this early spark has today transformed into a structured, impactful charitable organization.