क्रांतीज्योती सेवाभावी संस्थेचे कार्यक्षेत्र अधिकृतपणे शासकीय 'डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत' समाविष्ट असलेल्या दुर्गम भागात विस्तारलेले आहे. दादेगाव आणि हिवरा परिसरातील खालील वाड्यांचा या विकास क्षेत्रात समावेश असून संस्था येथे विशेष कार्यरत आहे;
दादेगाव परिसर: कोल्हेवाडी, कोकरेवाडी, महादेववाडी आणि सुरनरवाडी
हिवरा परिसर: भोजेवाडी [ View GR ]
या दुर्गम आणि डोंगरी भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे, डिजिटल साक्षरता आणणे आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
We are proud to share that Krantijyoti Sevabhavi Sanstha actively operates in the officially designated hilly regions. The following sub-villages (Wadis) under Dadegaon and Hivra are recognized and included under the Hilly Area Development Program;
Dadegaon Region: Kolhewadi, Kokrewadi, Mahadevwadi, and Surnarwadi
Hivra Region: Bhojewadi
Our institution is highly committed to bringing sustainable growth, infrastructure development, and digital empowerment to these remote hilly terrains.
नमस्कार,
"क्रांतीज्योती सेवाभावी संस्था" ही केवळ एक संस्था नसून समाजऋण फेडण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेला एक विचार आहे. आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ आणि आदरणीय मार्गदर्शकांनी शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कायदेविषयक मार्गदर्शन आणि कृषी यांसारख्या विविध क्षेत्रांतून समाजासाठी निरंतर योगदान दिले आहे. या कौटुंबिक आणि ऐतिहासिक संस्कारांचा वारसा पुढे चालवत, दादेगाव व हिवरा परिसरातील दुर्गम डोंगरी भाग, भिल्ल आदिवासी व भटक्या समाज घटकांपर्यंत सेवेचा प्रकाश पोहोचवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
मी स्वतः एक माध्यमिक शिक्षक असल्याने शिक्षणाची ताकद जवळून अनुभवली आहे. संस्थेच्या माध्यमातून आम्ही आजवर शिक्षण प्रसार, सार्वजनिक वाचनालय, पशूसंवर्धन (चारा छावण्या), कोविड-१९ अन्नछत्र आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारखे उपक्रम प्रत्यक्ष राबवले आहेत.
आगामी संकल्प आणि ध्येय:
भविष्यात शैक्षणिक संसाधने नसलेल्या विद्यार्थ्यांना दत्तक घेणे, विद्यार्थी गृहांची निर्मिती, CSC डिजिटल केंद्र, ई-लायब्ररी, महिला कौशल्य विकास आणि २४/७ रुग्णवाहिका सेवा यांसारखे प्रकल्प राबवण्याचा आमचा मानस आहे.
संस्थेची पारदर्शकता आणि NGO दर्पण नोंदणीच्या बळावर आम्ही सर्व CSR भागीदारांना व देणगीदारांना या सामाजिक कार्यात जोडण्याचे आवाहन करतो. संस्थेचा हा सेवायज्ञ अधिक व्यापक करण्यासाठी आणि ऐतिहासिक वारसा जपत नव्या पिढीला घडवण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य, आशीर्वाद आणि पाठबळ असेच पाठीशी राहील, हीच सदिच्छा व अपेक्षा!
आपला नम्र,
निलेश नेहरू विधाते
संस्थापक अध्यक्ष, क्रांतीज्योती सेवाभावी संस्था
दादेगाव, ता. आष्टी, जि. बीड.
स्वराज्य
समता
शिक्षण
संघटन
संस्कार
कुशल प्रशासन
स्त्री-शिक्षण
त्याग
"संस्थेच्या मुख्य कार्यालयालगत, डोंगरी विकास कार्यक्रम क्षेत्रात 'शिवनंदिनी मल्टी सर्व्हिसेस' (CSC Center), 'शिवनिरंजन सार्वजनिक वाचनालय व ई-लायब्ररी' आणि 'शिवनंदिनी महिला कौशल्य विकास कार्यक्रम' सुरू करण्याचा संस्थेचा मानस असून, याद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सेवा देण्याचे उद्दिष्ट आहे."
"शिवनिरंजन रुग्णवाहिका सेवा (प्रस्तावित प्रकल्प / Proposed Project)"
"दादेगाव व परिसरातील दुर्गम व डोंगरी भागातील भटके - आदिवासी व गरजू नागरिकांसाठी २४/७ आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा आमचा संकल्प आहे."
ज्येष्ठांच्या सुखी आणि सुरक्षित भविष्यासाठी टाकलेले एक पाऊल. आयुष्याची संध्याकाळ आनंदाने आणि सन्मानाने व्यतीत करता यावी, यासाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशा एका आदर्श 'ज्येष्ठ नागरिक निवासाची' निर्मिती करण्याचे भविष्यात नियोजित आहे. संस्थेचे खजिनदार श्री. नितीन विधाते यांच्या स्वप्नातून साकारत असलेला हा प्रकल्प, समाजातील निराधार ज्येष्ठांना हक्काचा आधार देण्याच्या ध्येयाने प्रेरित आहे.
"प्ले ग्रुप ते सिनिअर केजीपर्यंतच्या चिमुकल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आधुनिक शिक्षणासाठी संस्थेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प."
"ग्रामीण भागातील नागरिकांसाठी नजीकच्या काळात 'चॅरिटेबल क्लिनिक' आणि भविष्यात २० बेडचे सुसज्ज 'हॉस्पिटल' उभारून माफक दरात आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा आमचा संकल्प आहे."